Home स्टोरी परब मराठा समाज मुंबईच्या वतीने १५ मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रम!

परब मराठा समाज मुंबईच्या वतीने १५ मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रम!

121

मसुरे प्रतिनिधी: परब मराठा समाज मुंबई या संस्थेच्या महिला विभागाच्या वतीने ज्ञाती भगिनींचा “जागतिक महिला दिन” सोहळा १५ मार्च रोजी सायंकाळी ५.०० ते १०.०० या कालावधीत महाजनवाडी, भावसार सभागृह, परमार गुरुजी मार्ग, सेंट्रल रेल्वे वर्कशॉप समोर, परेल (पुर्व), मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.

हया प्रसंगी आपल्या महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.हळदी कुंकू, “पाककला स्पर्धा”- उपवासाचे पदार्थ, भाज्यांपासून दागिने बनवून आणणे व स्टेजवर परिधान करणे, संगीत खुर्ची, इतर विविध स्पर्धा कार्यक्रमास्थळी घोषित केल्या जातील.यावेळी विविध क्षेत्रात करीअर केलेल्या दहा महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.तरी समाज भगिनींनी प्रचंड संख्येने उपस्थित राहुन सोहळा यशस्वी करावा असे आवाहन सरचिटणीस  जी.एस. परब, महिला संघटक श्रीमती प्रतिक्षा प्रमोद परब यांनी केले आहे.