Home स्पोर्ट दोडामार्ग ची कुमारी साक्षी बंड्या गावडे हिची क्रिकेट साठी ऑलराऊंडर म्हणून निवड.

दोडामार्ग ची कुमारी साक्षी बंड्या गावडे हिची क्रिकेट साठी ऑलराऊंडर म्हणून निवड.

114

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुकन्या दोडामार्ग तालुक्यातील भेडसी खानयाळ येथील सद्यस्थितीत मुंबई दहिसर मधील कुमारी साक्षी बंड्या गावडे हिची क्रिकेट साठी ऑलराऊंडर म्हणून २८ फेब्रुवारीला निवड झाली आहे. गोवा रणजी क्रिकेट २३ वर्षाखालील महिलांच्या संघात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या कन्येची वर्णी लागल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कुमारी साक्षी गावडे हिचे मुंबई दहिसर येथे बालपण शालेय शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. मास्टर मास मीडिया मधून तिने पदव्युत्तर शिक्षण तिने पूर्ण केले आहे. ती इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटचे फार आवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये सोळा वर्षाखालील व १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. तिचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमी ने तिची २३ वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येते रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त मधील अशोक नारायण परब (मांजरेकर ) यांची नात अंडर २३ गोवा रणजी संघामध्ये निवड झाली. त्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे तिच्या या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी झालेल्या निवडीसाठी सामाजिक कार्यकर्ते -किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ. यांनी अभिनंदन केले आहे. आमच्या या गावची नात गोवा रणजीसाठी तिची निवड कौतुकास्पद आहे अशा शब्दात तिचे अभिनंदन केले आहे. ती म्हणते माझी ही निवड खरंच मला वेगळी प्रेरणा देणारी आहे. माझे वडील यांचे मार्गदर्शन मला लाभले असे ती म्हणाली.