Home स्टोरी महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन!

महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन!

115

मसूरे प्रतिनिधी: जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून वेताळ प्रतिष्ठान तुळस, वेंगुर्ला व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर -मेस्त्री, सांस्कृतिक मंच, मेस्त्रीवाडी, दाभोली, वेंगुर्ल्याच्या विद्यमाने महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कठोर वर्दीत ममतेचा स्पर्श – महिला पोलिसांची दुहेरी जबाबदारी हा विषय या स्पर्धेसाठी आहे.

महिला पोलिसांनी किमान ७०० ते कमाल १००० शब्दांमध्ये मराठीत आपले विचार मांडायचे आहेत. सोबत महिला पोलिस असल्याचे शिफारसपत्र जोडणे अनिवार्य आहे.

स्पर्धेची पारितोषिके

प्रथम क्रमांक – रोख ₹१०००, चषक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रोख ७००, चषक आणि प्रमाणपत्र,

तृतीय क्रमांक रोख ₹५००, चषक आणि प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ प्रथम रोख २५०, चषक आणि प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ द्वितीय रोख २५०, चषक आणि प्रमाणपत्र.

स्पर्धेसाठी निबंध वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस;

द्वारा: प्रा.डॉ.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो. तुळस, ता.वेंगुर्ला,जिल्हा सिंधुदुर्ग, पिन – ४१६५१५.या पत्त्यावर

स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष हाती खालील पत्त्यावर ०५ एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावा.अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा,

असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.