Home स्टोरी आंगणेवाडी येथे २५ फेब्रुवारीला “डार्लिंग डार्लिंग” नाट्यप्रयोग!

आंगणेवाडी येथे २५ फेब्रुवारीला “डार्लिंग डार्लिंग” नाट्यप्रयोग!

82

मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता “डार्लिंग डार्लिंग ” हे तुफान विनोदी नाटक होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक महेश सावंत पटेल, नेपथ्य शरद कांबळी, अंकुश कांबळी तर रंगभूषा तारक कांबळी यांची आहे. या नाटकांमध्ये संकेत आंगणे, निशिकांत आंगणे, स्वप्निल आंगणे, नितेश आंगणे, मिलिंद आंगणे, संतोष आंगणे, प्रसाद आंगणे, अर्जुन परब, हीमानी सुर्वे, रश्मी शेट्टी, दीप्ती भोवसकर, भाग्यश्री जोईल,ओंकार साळकर, नितेश वंजारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाट्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.