मसूरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच श्री शेखर पेणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत वरचीगुरामवाडीचे उपसरपंच श्री धोंडी गोविंद कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री विलास बांदेकर,सदस्या सौ.विद्या गिरकर,सौ सुप्रिया गुराम पोलिस पाटील सौ.महाभोज , ग्रामपंचायत अधिकारी श्री.लक्ष्मण धोंडी सरमळकर ,कृषी सेवक श्री सौगंडे, ग्रामस्थ श्री अनिल ढोलम, लक्ष्मण महाभोज, बाळ महाभोज तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.