सावंतवाडी प्रतिनिधी: इन्सुली रमाई नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते उद्याच्या उत्सवासाठी महाराजांची जयंती करण्यासाठी रमाई नगर येथील ग्रामस्थ समाज मंदिरची चावीची मागणी करण्याकरिता इन्सुली ग्रामपंचायतकडे गेले असता आपल्याजवळ चावी नाही तर समाज मंदिराची चावी सरपंच यांच्या जवळ आहे असं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले तर सरपंच यांना फोन केला असता आपण ओरसला आहोत आपल्याला यायला उशीर होणार असे सांगण्यात आले.
सदर रमाई नगर येथील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, महिला व युवक सकाळी दहा वाजल्यापासून २:३० वाजेपर्यंत ते अजूनही इन्सुली ग्रामपंचायत येथे थाटमांडून बसले आहेत. तरी उद्याच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समाज मंदिरातच साजरी करणार असा एल्गार ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रसंगी राघोबा जाधव, सूर्यकांत जाधव, परेश जाधव, सिद्धेश जाधव, दीपक जाधव, नितेश जाधव, अरविंद जाधव, महादेव जाधव अजय जाधव, तेजस जाधव, सविता जाधव, वृषाली जाधव, सपना जाधव, संजना जाधव, दिपाली जाधव, अनुजा जाधव, दीपेश जाधव,स्मिता जाधव, सानिका जाधव, संपदा जाधव, तसेच तसेच रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप कांबळे व सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव उपस्थित होते