मसूरे प्रतिनिधी: पळसंब येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. यनिमित्त सकाळी ८:३० वाजता श्री जयंती मंदिर ते जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब पर्यत वाजत गाजत रॅली, सकाळी ८:३० वाजता जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे शिवरायांची चरण पुजा, मशाल रॅली, मर्दानी खेळ, अल्पोपहार, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर स्थानिक ग्रामस्थाचे मनोगत, कार्यक्रमाचा समारोप होईल. उपस्थितीचे आवाहन श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांनी केले आहे.