१८ फेब्रुवारी वार्ता: राज्य परिवहन महामंडळात ऑक्टोबर महिन्यापासून प्रॉव्हिडंट फंडाचे (भविष्य निर्वाह निधीचे) पैसे दिले जात नाहीत. महामंडळाने कर्मचार्यांचे हफ्ते न भरल्यामुळे कर्मचार्यांना पैसे काढता येत नाहीत. महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचार्यांच्या वेतनावरच खर्च होतो. त्यामुळे तोट्यातील महामंडळाला सरकारकडून निधीची अपेक्षा आहे; पण सरकारकडून महामंडळाला निधीच मिळाला नाही. प्रॉव्हिडंट फंडाच्या निधीसाठी मंडळाला महिन्याला ४८० ते ४९० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. राज्य सरकारवरील आर्थिक ताणाचा फटका राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांना बसत आहे. शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे सध्याचे राज्याचे परिवहन मंत्री आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिन संजीव शेठी यांची नियुक्ती केली आहे. तरीही अशी स्थिती आहे.