Home स्टोरी वेरली येथे ग्रामसंवाद उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

वेरली येथे ग्रामसंवाद उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

53

मसूरे प्रतिनिधी: वेरली ग्रामपंचायत येथे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मालवण यांच्यामार्फत ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी घन:शाम आढाव, मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षक श्रीमती पी. ए. खोत उपस्थित होत्या. यावेळी सायबर क्राईम, आर्थिक ऑनलाइन फसवणूक, मोबाइल वापर आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांच्या समस्या त्या त्या विभागापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले. ग्रामस्थांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच धनंजय परब, पोलीस अंमलदार श्री विवेक फरांदे, उपसरपंच दिनेश परब, ग्रामसेविका एम. एम. कुणकवळेकर, पूजा वेरलकर, सुवर्णा परब, नम्रता मेस्त्री, आरोग्य सेविका एस. व्ही. धुरी, अनंत भोगले, उमेश खराबी, किरणकुमार डोइगड, अविनाश उबाळे, वामन परब, भाग्येश परब, प्रमोद परब, एस. एस. चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत सरपंच धनंजय परब यांनी केले.