Home स्टोरी भारत देशात एन्फ्लुएंझा व्हायरसचा शिरकाव!

भारत देशात एन्फ्लुएंझा व्हायरसचा शिरकाव!

117

भारत देशात एन्फ्लुएंझा व्हायरसचा शिरकाव झालेला आहे. महाराष्ट्र राज्यात एन्फ्लुएंझा व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. काही दिवसांपासून शहरासह राज्यातील तील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे अनेकांना ताप, सर्दी, डोकेदुखी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. खोकला फार काळ टिकत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असला तर तो एन्फ्लुएंझाचा धोका असू शकतो. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या दिवसांमध्ये सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवतात. मात्र या वर्षी त्यामध्ये वाढ झाली असून, नव्याने एच ३ एन २ व्हायरस आला आहे. हा कोविड नाही किंवा तेवढा अपायकारकही नाही. रुग्णांनी आवश्यक ते उपचार व काळजी घेतली पाहिजे. हा आजार हवेद्वारे पसरत नसला तरी शिंकेतून त्याचा प्रसार होतो. त्यामुळे मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे ही पथ्ये पाळली पाहिजेत.एन्फ्लुएंझा व्हायरसची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत, भरपूर ताप येतो तो चार पाच दिवस राहतो, उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. परिणामी प्रतिकार शक्ती होते तेव्हा अशक्तपणा येऊ शकतो त्यामुळे दिवसभरात तीन चार लिटर पाणी प्यावे, संसर्ग थुंकीतून पसरतो त्यामुळे मास्क वापरावा गर्दीत जाणे टाळा, बाहेरून घरी आल्यानंतर स्वच्छता राखावी.