Home स्टोरी सावंतवाडी शहरात डास प्रतिबंधक फवारणी करा..! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची नगरपालिकेकडे मागणी.

सावंतवाडी शहरात डास प्रतिबंधक फवारणी करा..! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची नगरपालिकेकडे मागणी.

54

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरामध्ये डासांचे प्रमाण खूपच वाढत चाललेले आहे त्यामुळे शहरातील जनता त्रस्त झालेली आहे. काही महिन्यान पूर्वी ठराविकच ठिकाणी शहरात डास प्रतिबंधक फवारणी केली होती परंतु काही भाग वंचित राहिला. सध्या स्थितीमध्ये डासांचे प्रमाण खूपच वाढले आहे परिणाम हे प्रमाण आजारांना निमंत्रण देणारे ठरणार आहे.

शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन डास प्रतिबंधक फवारणी होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटल परिसर, बस स्टॅन्ड, मोती तलावाचा काठ, बाजारपेठ, शहरातील हॉटेल परिसर, सार्वजनिक स्वच्छालये, शासकीय कार्यालये या ठिकाणी देखील डास प्रतिबंधक फवारणी करणे आवश्यक आहे. नगरपालिकेने यासाठी लवकरात लवकर डास प्रतिबंधक फवारणी करून शहरातील जनतेला सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केले आहे.