Home स्पोर्ट राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सायली...

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सायली सखाराम सावंत राज्यात प्रथम.

49

सावंतवाडी प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय पॉवर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची खेळाडू कुमारी सायली सखाराम सावंत हिने 52 किलो वजनी गटामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत ह.हा. सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले राणीसाहेब यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एम. ए. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक श्री. व्ही. पी. राठोड, क्रीडा विभागाचे शिक्षक आर. एम. सावंत सौ. के. पी. लोबो. आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.