सावंतवाडी प्रतिनिधी: मुंबई विद्यापीठाचा उडान महोत्सव ला २३ वर्षे पूर्ण होत आली आहेत. सातत्याने २३ वर्ष संपूर्ण विद्यापीठाच्या महाविद्यालयात दरवर्षी उडान महोत्सव घेतला जातो. उडान महोत्सवाची पंचवीस वर्ष रोप्य महोत्सवी वर्ष जल्लोषात व मोठ्या भव्य दिव्य वातावरणात साजरा केला जाणार आहे. कोकण विभागात मुंबई विद्यापीठाचा उडाण महोत्सवा चा रोपे महोत्सव सावंतवाडी लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे साजरा केला जाणार आहे. या कॉलेजची निवड रौप्य महोत्सवी उडाण महोत्सवासाठी निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक योद्धा घडवणे आणि यातून सामाजिक सांस्कृतिक एक साखळी निर्माण करून विद्यार्थ्यांची उन्नती साधण्याच्या दृष्टीने उडाण महोत्सव महाविद्यालय स्तरावर घेण्यात येत आहे. या महोत्सवा मधून विद्यार्थ्यांनी स्वतः आपले उन्नत ते साधून करिअर करावे असा हेतू आहे. असे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मुंबई विद्यापीठाचे समन्वयक डॉ कुणाल जाधव यांनी स्पष्ट केले.
उडाण महोत्सव २०२५ चा पथनाट्य स्पर्धेत प्रथम कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय तर वकृत्व स्पर्धेत प्रथम देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, क्रिएटिव्ह रायटिंग प्रथम पंचम खेमराज महाविद्यालय लॉ कॉलेज, पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम कुडाळ व्हिक्टर डॉटर्स लॉ कॉलेज, हे विजेते ठरले. यंदाच्या उडान महोत्सवात देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ने आपले वर्चस्व कायम राखले. उडाण महोत्सवात जवळपास १७ कॉलेज चा डंका अनुभवता आला.
सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले कुडाळ या चार तालुक्यातील जवळपास १७ महाविद्यालय व कॉलेज चे जवळपास ३०० विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या उडाण महोत्सवात सहभागी झाले होते. सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात उडान महोत्सवाचे यजमानपद देण्यात आले होते. या उडान महोत्सवाचे उद्घाटन लोकमान्य ट्रस्ट चे संचालक सचिन मांजरेकर व विद्यापीठाचे समन्वयक डॉक्टर कुणाल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, तरुण भारतचे पत्रकार ऍड संतोष सावंत, लोकमान्य ट्रस्ट सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे महेश तानावडे, हळवे कॉलेज दोडामार्ग चे प्राचार्य सुभाष सावंत. क्षेत्रीय समन्वयक महेंद्र ठाकूर, क्षेत्रीय समन्वयक उमेश परब, डॉक्टर सचिन राऊत, मुंबई विद्यापीठाचे टेक्निशियन किरण पाटील, प्राचार्य यशोधन गवस आधी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री जाधव पुढे म्हणाले सन २००३ पासून मुंबई विद्यापीठ उडान महोत्सव घेत आहे या महोत्सवाला २३ वर्षे पूर्ण होत आली आहेत. रौप्य महोत्सव सावंतवाडीत देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेजमध्ये भव्य दिव्य वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. तसे निश्चित करण्यात आले आहे. या महाविद्यालयात कोकणातील उडाण महोत्सव आतापर्यंत उत्तम दर्जाचे झाले आहेत. उत्तम नियोजन आणि या कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांची टीम उत्तमरित्या महोत्सवाच्या आयोजन करत आहे. त्यामुळे रौप्य महोत्सव मुंबई विद्यापीठाचा कार्यक्रम याच कॉलेजमध्ये केला जाईल. खरंतर उडाण महोत्सव मध्ये पथनाट्य वकृत्व लेखन पोस्टर अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. या माध्यमातून आतापर्यंत विद्यापीठाचे विद्यार्थी अनेक टीव्ही सिरीयल मध्ये चमकत आहेत. खरंतर सामाजिक प्रेरणा निर्माण होणे सामाजिक सांस्कृतिक साखळी आणि एकता आणि यातून उन्नती साधने विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने असे महोत्सव भरवले जात आहेत. सामाजिक योद्धा त्याला प्रशिक्षण देऊन उडाण महोत्सवातून नाविन्यपूर्ण विद्यार्थी उन्नती साधणारा विद्यार्थी निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले. B.ed विद्यार्थी पूर्ण झाल्यानंतर त्यांना एम ए बी एड झाल्यानंतर पीएचडी ची व्यवस्था यंदापासून विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संचालक डॉक्टर बळीराम गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, विद्यापीठाच्या माध्यमातून असे महोत्सव भरवले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. यातून एक नवी संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. याचा लाभ घ्या आणि परफॉर्म्स दाखवा असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ऍड..संतोष सावंत, प्रवीण प्रभू केळुसकर, सुभाष सावंत यांनी स्पष्ट केले की, देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजला कायमस्वरूपी उडान महोत्सवाचे यजमानपद द्यावे. या ठिकाणी उत्तम नियोजन केले जात आहे. अशा महोत्सवातून विद्यार्थी घडवले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाम मिळत आहे. असे महोत्सव व्हायला हवेत. महोत्सवात विविध उपक्रम राबवले जातात त्याची एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात यावी. जेणेकरून गावागावात विद्यार्थ्यांना परफॉर्मन्स करणे सोयीचे होईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी सन गेली पंधरा-वीस वर्ष हे कॉलेज विविध उपक्रम राबवत आहे. लोकमान्य ट्रस्टचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या भागातील विद्यार्थ्यांना आपल्याच भागात शिक्षणाची सोय व्हावी यासाठी या ठिकाणी कॉलेज उभारले आहे. या कॉलेजमध्ये मुंबई विद्यापीठाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पथनाट्य स्पर्धेत प्रथम कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय, दुतीय पणदूर, पद्मश्री बाळासाहेब वेंगुर्लेकर कॉलेज, तृतीय पंचम खेमराज महाविद्यालय, उत्तेजनार्थ देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज व जय हिंद कॉलेज साळगाव, पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम कुडाळ व्हिक्टर लॉ कॉलेज, दुतीय देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, तृतीय संत राऊळ महाराज कुडाळ, उत्तेजनार्थ पणदूर श्री पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर कॉलेज, क्रिएटिव्ह रायटिंग प्रथम पंचम खेमराज लॉ कॉलेज, द्वितीय प्रमोद धुरी अध्यापक महाविद्यालय साळगाव, तृतीय आमदार दीपक केसरकर कॉलेज दोडामार्ग, उत्तेजनार्थ वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालय तर वकृत्व स्पर्धेत प्रथम देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, द्वितीय व्हिक्टर डॉटर्स लॉ कॉलेज कुडाळ, तृतीय लक्ष्मीबाई सीताराम हळवे कॉलेज दोडामार्ग, उत्तेजनार्थ प्रमोद धुरी अध्यापक कॉलेज साळगाव व वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालय यांनी उडान महोत्सवात आपली चमकदार कामगिरी केली. यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व सचिन मांजरेकर, समन्वयक कुणाल जाधव आदींच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी परीक्षक नारायण परब, श्री कासार, विजया राऊळ आदींनी काम पाहिले. सूत्रसंचालन साईश पंडित तर आभार श्री शैलेश गावडे यांनी मानले. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर कुणाल जाधव यांच्या हस्ते संचालक सचिन मांजरेकर, प्राचार्य यशोधन गवस, महेंद्र ठाकूर, उमेश परब, सुभाष सावंत आदींचा गौरव करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते जवळपास १७ कॉलेजमधून तीनशे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.