सावंतवाडी प्रतिनिधी: केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्त पेढीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात सर्व केमिस्ट, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसह रक्तदाते तसेच रक्तदान चळवळीतील संघटनेच्या रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम आणि सचिव संजय सावंत आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनायक दळवी, सचिव संतोष राणे यांनी केले आहे.