सावंतवाडी प्रतिनिधी: अरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अरुणदा हायस्कूल आयोजित डॉ. वाय. पी. नाईक पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिला गट पहिली ते चौथी, दुसरा गट पाचवी ते सातवी, तिसरा गट आठवी ते दहावी अशा तीन गटात स्पर्धा होणार आहेत. प्रथम तीन क्रमांकासाठी प्रत्येकी ५०००, ३०००, २००० रुपये व स्मृतिचिन्ह पारितोषिक दिले जाणार आहे. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून तीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांची भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा २८ जानेवारी रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत होणार आहे व त्याच दिवशी निकाल ३:३० वाजता पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धकांना पेपर आयोजकांकडून पुरवला जाईल. इतर साहित्य व रंग विद्यार्थ्यांनी स्वतः आणायचे आहे. स्पर्धेच्या वेळी तिन्ही गटानुसार विषय दिला जाणार आहे. त्यानुसार चित्र काढायचे आहे. तरी इच्छुकांनी आपली नावे २६ जानेवारी पर्यंत हायस्कूलचे कलाशिक्षक चंदन गोसावी यांना 8390141455 या मोबाईल क्रमांकावर नोंदवावीत अथवा व्हाट्सअप क्रमांकावर नावे नोंदवावी. तरी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवा असे आवाहन संस्था अध्यक्ष संदेश परब व मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी केले आहे.