Home स्टोरी समाजाला आवश्यक विवीधांगी उपक्रम देण्याचा कायम प्रयत्न सह्याद्री फाऊंडेशनने केला..! मनिष दळवी

समाजाला आवश्यक विवीधांगी उपक्रम देण्याचा कायम प्रयत्न सह्याद्री फाऊंडेशनने केला..! मनिष दळवी

37

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलेला एक नवस्वरूप देण्याच्या दृष्टीने आमदार दिपक केसरकर यांनी सिंधू रत्न योजनेतून दशावतार कंपनी यांना वाहन खरेदी करून दिले आहे. आता पुढील काळात ही दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केले जातील आणि राजाश्रय मिळवून दिला जाईल. सह्याद्री फाउंडेशनने तीन दिवसीय दशावतार महोत्सव आयोजित केला. यातून दशावतार कला जिवंत ठेवण्याचे काम ही संस्था करत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले सावंतवाडी येथे जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ १९ ते २१ जानेवारी या कालावधीत सह्याद्री फाऊंडेशन व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व बेळगावचे उद्योजक प्रसन्न घाडगे, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर बेळगावचे उद्योजक प्रसन्न घाडगे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत गावडे, एडवोकेट श्री परब, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर आधी उपस्थित होते

यावेळी बोलताना दळवी म्हणाले, समाजाला आवश्यक विवीधांगी उपक्रम देण्याचा कायम प्रयत्न सह्याद्री फाऊंडेशनने केला आहे. जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक क्रिडा क्षेत्रात आदर्शवत काम व्हावे यासाठी सह्याद्री फाऊंडेशनचा पुढाकार राहिलेला आहे.त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी बेळगावचे उद्योजक प्रसन्न घोडगे सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सह्याद्री फाउंडेशन दशावतार नाट्य महोत्सवाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला असून सावंतवाडी मधील चांगल्या वातावरणामध्ये दशावतार कलेचा मोठा प्रेक्षकवर्ग असून असेच विवीधांगी कार्यक्रम भविष्यातही राबवावेत असे आवाहन केले. या कलेमुळे शहरात नवी उमेद तयार व्हावी. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह्याद्री फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले. यावेळी त्यांनी सह्याद्री फाउंडेशनच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे प्रमुख देवेंद्र नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तर सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना उद्योजक प्रसन्न घाटगे म्हणाले आपणही दशावतारी प्रेमी असून हे नाटक पाहण्यासाठी दूर दूर पर्यंत गेलो आहे. ही कला जोपासण्याचे काम सह्याद्री फाउंडेशन करत असल्याबद्दल त्यांनी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. हे सामाजिक कार्य असे सुरू ठेवावे. असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी नाट्य कंपनीचे मालक देवेंद्र नाईक यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण यांचा सत्कार श्री राऊळ यांनी केला

या कार्यक्रमास अध्यक्ष रवींद्र मडगावकर सचिव प्रताप परब, अजय गोंदावळे, तारकेश्वर सावंत, सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर,  संस्थेचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, माजी सचिव प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, शशिकांत मोरजकर, दिपक राऊळ, तारकेश सावंत, गजानन बांदेकर, फाउंडेशनच्या उपाध्यक्ष मोहिनी मडगावकर, खजिनदार हर्षवर्धन धारणकर,  वेर्ले उपसरपंच मोहन राऊळ, अशोक सांगेलकर, सुनील खानोलकर,  सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सिद्धेश सावंत, अनिल राऊळ, राजन राऊळ आधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अॅड संतोष सावंत यांनी तर आभार माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नाट्य प्रेमी उपस्थित होते.