Home स्टोरी आजगाव भोमवाडी ग्रामपंचायत पोर्टलवर दिसत नसल्याने सरपंच अनुराधा वराडकर करणार उपोषण?

आजगाव भोमवाडी ग्रामपंचायत पोर्टलवर दिसत नसल्याने सरपंच अनुराधा वराडकर करणार उपोषण?

141

सावंतवाडी प्रतिनिधी: आजगाव भोमवाडी ग्रामपंचायत पोर्टलवर दिसत नसल्याने ग्रामपंचायत १५ वित्त आयोगाची बिले खर्च करता येत नाहीत. त्यामुळे सदर ग्रुप ग्रामपंचायत ला स्वतंत्र एलजीडी कोड असतानाही असा अन्याय का? यातून आम्हाला मुक्ती द्यावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच अनुराधा वराडकर यांनी दिला आहे. आमदार दिपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांनी लक्ष ही वेधले आहे. श्री केसरकर यांनी  तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही. निश्चितपणे तुमचा हा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले. १९७६ साली ग्रामपंचायत विभाजन होऊन भोमवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. असे असताना या ग्रामपंचायतीला पोर्टलवर समाविष्ट का करण्यात आले नाही?  पोर्टलवर दिसत नसल्याने सध्या ऑनलाईन कामे होताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच पंधरा वित्त आयोगाची खर्च करणे ही कठीण झाले आहे. पंधरा वित्त आयोगाची रक्कम खर्च करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत आहे. आमदार दीपक केसरकर यांच्याकडे कैफियत मांडली. यावेळी श्री केसरकर यांनी तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही. तुमचा हा प्रश्न सोडवला जाईल. असेही आश्वासन दिले जर का हा प्रश्न सुटला नाही तर २६ जानेवारीला उपोषणाला बसण्याची नोटीस जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.