Home स्टोरी गोळवण शाळा नं. १ येथे वाय-फाय सुविधा कार्यान्वित.

गोळवण शाळा नं. १ येथे वाय-फाय सुविधा कार्यान्वित.

101

मालवण प्रतिनिधी: गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीमार्फत गोळवण जि. प. शाळा नं. १ साठी ” वाय-फाय सुविधा “कार्यान्वित करण्यात आली. यावेळी सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, मुख्याध्यापक संतोष पाताडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश (भाई) चिरमुले व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच सुभाष लाड म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेला वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भौतिक, बौद्धिक ज्ञान व माहितीसाठी होणार आहे. शाळेतील संगणकाद्वारे शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी या वाय- फाय सेवेचा मोठा उपयोग होईल. भविष्यात येथील विद्यार्थी संगणकीय ज्ञानातून शिक्षण घेऊन परिपूर्ण होतील, अशी अपेक्षा सुभाष लाड यांनी व्यक्त केली. मुख्याध्यापक संतोष पाताडे यांनी शाळेतर्फे या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले.