Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हा श्रीगणेश मूर्तीकारसंघच्या वतीने मुलांसाठी शाडूमातीची गणेश मूर्ती बनविणे स्पर्धेचे आयोजन.

सिंधुदुर्ग जिल्हा श्रीगणेश मूर्तीकारसंघच्या वतीने मुलांसाठी शाडूमातीची गणेश मूर्ती बनविणे स्पर्धेचे आयोजन.

28

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा श्रीगणेश मूर्तीकारसंघने मुलांची शाडूमातीची गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा सिद्धीविनायक हॉल कसाल येथे आयोजित केली होती. चार तासात मुलानी गणेश मूर्ती बनविल्या. दोन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

पहिला गट ६ वर्षे ते १३ वर्षे, दुसरा गट १४ वर्षे ते १८ वर्षे अशी ही स्पर्धा होती. पहिल्या गटात पहिले बक्षीस नीरज नारायण परब (म्हापण ), दुसरे बक्षीस मयुरेश संदिप गडेकर (कुडाळ कविलकाटे), तिसरे बक्षीस रामचंद्र रघुनाथ घाडी (पावशी), उत्तेजनार्थ-आयुष अमोल मेस्त्री (मसूरे) व मोठागट–पहिले बक्षीस,विष्णू उदय आरोलकर (दाभोली ), दुसरे बक्षीस–मयांक विनायक दाभोलकर (दाभोली), तीसरे बक्षीस शुभम सखाराम शेकटकर (पिंंगुुळी), उत्तेजनार्थ–ओम विजय राऊत (माडखोल) याप्रमाणे बक्षीस वितरण झाले.

मुलांनी बनवलेली गणेश मूर्ती

लहान गटात ६४ मुलांनी व मोठ्या गटात ३५ मुलांनी भाग घेतला होता. सर्व विजेेत्यांसाठी कै. वसंत विठ्ठल देसाई यांच्या स्मरणार्थ देसाई परिवाराकडून सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच श्री. बाळा देसाई ओसरगाव,  श्री.उदय अळवणी सावंतवाडी, श्री. प्रकाश सावंत,  श्री. विलास मांजरेकर, श्री .बापूसावंत, श्री .सिद्धेश कानसे (माजगाव) श्री .रणजित मराठे (कुणकेरी ) यांनी विजेत्या मुलाना रोख बक्षीसे दिली.

तसेच मूर्तीकारांसाठी गोमय, लगदा व कोकोपीट यापासून गणेश मूर्त्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. .त्यासाठी मुंबई,कल्याण, गोवा, कागल, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मिळून ४२ मूर्तीकार उपस्थित होते .यावेळी मूर्तीकारसंघाने चालूवर्षापासून सर्व भाविकांनी मातीच्याच मूर्तीचे पूजन करावे.असे आवाहन करण्यात आले. भाविकांनी आपल्या मूर्तीकाराकडे मातीच्याच मूर्तीचा आग्रह धरावा असे पत्रकही सर्व मुले,पालक व प्रशिक्षणार्थी यांना देऊन आवाहन करण्यात आले .