Home स्टोरी पारंपरिक कला सादर करण्यात कोकण अग्रेसर! कोकणात शिमगोत्सव कोकणी कलाकारांच्या वेगवेगळ्या...

पारंपरिक कला सादर करण्यात कोकण अग्रेसर! कोकणात शिमगोत्सव कोकणी कलाकारांच्या वेगवेगळ्या पारंपरिक नृत्याने होतोय साजरा….

577

सिंधुदुर्ग वार्ताहर: सध्या कोकणात शिमगोत्सव जोरात सुरू आहे. कोकणात वेगवेगळ्या पारंपरिक कला सादर करून शिमगोत्सव साजरा केला जातो.

कोकणातील जळवीवाडी, गाव पाट, तालुका कुडाळ येथील पारंपरिक राधा नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोकणातील, गावातील कलाकार सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. कोकणात उत्तम असे एक से बढकर एक कलाकार आहेत. कोकण ही कलाकारांची भूमी आहे. त्याचेच हे एक उत्तम असे उदाहरण आहे. कोकणात सध्या शिमगोत्सव कोकणी कलाकारांच्या वेगवेगळ्या नृत्य कला प्रदर्शनाने साजरा होत आहे.

प्रसिद्ध रोंबाट आणि चित्र देखावे

नेरुर येथील साईचा टेंब येथील गावाकऱ्यांनी प्रसिद्ध रोंबाट आणि चित्र देखावेही सादर केले. यावेळी नेरूर गावातील प्रसिद्ध रोंबाट आणि चित्र देखावे बघण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. ही माहिती नेरूर येथील महादेव वेळकर यांनी दिली आहे.