मालवण प्रतिनिधी: मुणगे सावंतवाडी येथील ग्रामस्थ आणि भाजप नेते गोविंद सावंत यांच्या पुढाकाराने येथील रस्त्याला पडलेले खड्डे सिमेंट काॅक्रेंटीकरण करून बुजविण्यात आले. मुणगे सावंतवाडी रस्ता हा खुपच खराब झाला होता. अपघात होण्याची भिती निर्माण झाली होती. सदर रस्ता सिमेंट काॅक्रेंट केल्याने त्या रस्त्याने ये- जा करणारे ग्रामस्थ व वाहन धारकांनी समाधान व्यक्त केले. रस्ता सिमेंट काॅक्रेंटीकरण व्हावा यासाठी भाजप नेते गोविंद सावंत यांनी पुढाकार घेतला. वाडीतील ग्रामस्थांच्या मदतीतून काम पूर्ण केल्याने गोविंद सावंत यांनी वाडीतील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी मनोज सावंत, जयेश सावंत, अरविंद सावंत, लवू बागवे, दुलाजी सावंत, प्रमोद सावंत, शैलेश सावंत, अण्णा सावंत, संतोष लब्दे, सत्यवान लब्दे, गणेश लब्दे, मंगेश लब्दे, रूपेश तेली, विनोद सावंत, सुनिल सावंत, पंकज सावंत, अमित सावंत, बाळा सावंत, देविदास सावंत. प्रसाद बागवे, बंडू सावंत, यश सावंत, अर्थव तेली आदी ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.