अयोध्या: विश्वातील भारतीयांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान, शक्तिस्थान असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्या येथील श्रीराम मंदिरात च्या प्रथम वर्धापन दिन तथा वर्षपूर्तीचे औचित्य साधून आपल्या पानवळ येथील राम मंदीरामध्ये दि. ११ जानेवारी २०२५ दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
-: आनंदोत्सवाची रुपरेषा पुढीलप्रमाणे :-
• दि. ११/०१/२०२५ सकाळी ६ वाजता – काकड आरती
• सकाळी ७ ते ९ – श्री राम व पंचायतन मुर्ती अभिषेक व महापुजा
• सकाळी ९ ते दु. १२.०० – श्रीराम मंदीर, पानवळ येथे नामस्मरण, रामनाम जप व रामरक्षा पठण.
• दुपारी १२.०० ते १२.४५ – श्रीराम मंदीर, पानवळ येथे आरती, शंखनाद व घंटानाद
• दुपारी १२.४५ ते ३.३० – श्रीराम मंदीर, पानवळ येथे महाप्रसाद (समस्त रामभक्तांनी सहकुटुंब महाप्रसादाचा लाभ घ्यावा.)
• संध्या. ४.०० ते ६.०० – श्रीराम मंदीर, पानवळ येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कु. दुर्वा सावंत यांचे सुश्राव्य कीर्तन. हार्मोनियमः-श्री. रामचंद्र मेस्त्री, तबला साथ. श्री. महेंद्र चव्हाण
संध्याकाळी ६.०० ते रा. ९.०० श्रीराम मंदीर, पानवळ येथे स्थानिक बांदा पंचक्रोशीतील महिला रामभक्तांची भजने व मंदिर परिसरात दीप प्रज्वलन
• रात्रौ ९.०० नंतर – श्रीराम मंदीर, पानवळ येथे धुपारती.
समस्त बांदावासियांना विनम्र आवाहन करण्यात येते की, या पवित्र कार्यात सहकुटुंब सहपरिवार हजर राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा आपल्याला जिथे व जेवढी शक्य होईल तेवढी सेवा द्यावी व प्रभु श्रीराम कृपेचा लाभ घ्यावा.