गुजरातमध्ये गो पर्यटन आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून Agro Tourism Vishwa च्या वतीने दि. १८ मार्च ते १९ मार्च २०२३ रोजी आजरा कृषी पर्यटन केंद्र, ता. आजरा, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन व गो पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत काय शिकाल कृषी व गो पर्यटनाची संकल्पना व व्याख्या, कृषी पर्यटन आणि गो पर्यटन एकमेकांना पूरक, कृषी पर्यटनातील विविध टप्पे, कृषी व गो पर्यटनाची गरज व संधी, कृषी व गो पर्यटनाची यशोगाथा,गो आधारित शेती व पर्यटन, गो आधारित उत्पादने, पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन, कृषी पर्यटन विस्तार व व्याप्ती, शासकीय योजना व मदत, कृषी पर्यटन धोरण २०२० पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात?, परवानगी व कायदेशीर सल्ला,गौ व कृषी पर्यटनाचे भविष्य, तुमचा ग्रहाक कोण ते कसा मिळवायचा?, मार्केटिंग व सोशल मिडिया याबाबत कार्यशाळेमध्ये माहिती दिली जाणार आहे.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या व्यक्तींना १) सहभागी प्रमाणपत्र२) कृषी पर्यटन धोरण २०२० प्रत३) देशी व स्थानिक झाडांची यादी४) विशेष माहिती दस्त५) आणि बरंच काही देण्यात येणार आहे.या कार्यशाळेत मा. जयसिंगराव देसाई (मंडल कृषी अधिकारी, आजरा), मा. सुर्यकांत पोतुलवार (गौ पर्यटन व सेंद्रिय शेती), मा. विनोद बेले(यशोगाथा, कल्पतरू कृषी पर्यटन, सांगोला),मा. जितेंद्र नवार (कृषी पर्यटनातील विविध टप्पे), मा. गणेश चप्पलवार (आशय निर्मिती आणि मार्केटिंग) हे मुख्य आणि विशेष मार्गदर्शक असणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी ३०००-(तीन हजार रुपये ) शुल्क आकारण्यात आले आहे. यामध्ये प्रशिक्षण, राहणे आणि जेवण अशा सुविधा उपलब्ध आहेत.या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी १७ मार्च २०२३ पर्यंत करणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी ९७३००२३९४६ agrotourismvishwa@gmail.com, agrotourismvishwa.in