Home स्टोरी गुळदुवे ग्रामस्थांनी राबवली नदीपात्र साफसफाई मोहिम.

गुळदुवे ग्रामस्थांनी राबवली नदीपात्र साफसफाई मोहिम.

60

सावंतवाडी प्रतिनिधी: नदीचे पाणी झाडी नदी पात्रात वाढल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे पुर मोठ्या प्रमाणात येतो व शेतीत पाणी घुसते व मोठी आपत्ती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. शासन स्तरावर याची उपाय योजना व्हावी ही विनंती करूनही काहीच उपाय न झाल्याने अखेर गुळदुवे येथील गावकरीच एकत्र आले आणि त्यांनी नदीपात्र अशी साफसफाई मोहीम राबवली.

या साफसफाई मोहिमेमध्ये रुपेश धरणे, रवींद्र धरणे, नंदू धरणे, प्रशांत खोबरेकर, कमलकांत कोल्हे, दिलीप मामलेकर, मुकुंद धरणे,अरुण धरणे, रघुनाथ धरणे, रमाकांत शेटकर आदी ग्रामस्थ हजार होते.नदीपात्र साफसफाई मोहीम राबवून गुळ धुळे ग्रामस्थांनी शासनाला आदर्श घालून दिला आहे.