सावंतवाडी प्रतिनिधी: डिसेंबर महिना म्हटला की नाताळ आणि नव्या वर्षाची चाहूल सुरू होते. ख्रिश्चन बांधवांमध्ये नाताळ सणाची लगबग अन नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात नाताळ सणानिमित्त ख्रिसमस सोहळा कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभाग निहाय ख्रिसमस कॉरोल सिंगिंग सुरू आहे.
काजर कोंड येथे जवळपास एकत्रित ख्रिस्ती बांधव एकोपा एकजुटीचा संदेश देत घरोघरी जाऊन एक अनोखा नाताळ सणाचा माहोल अनुभवत आहेत. येत्या २४ डिसेंबरला नाताळ उत्सव साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आठ ते पंधरा दिवस ख्रिस्ती बांधव आपापल्या प्रभाग निहाय घरोघरी जाऊन एक अनोखा संगम साधत आहेत. त्यामुळे नाताळ सणाची लगबग आणि जयत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या दोन चार दिवसांवर नाताळ सण आणि नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाणार आहे. संपूर्ण बाजारपेठ नाताळ सणाच्या चाहुलाने सजून गेली आहे.
कोलगाव, चराटा, कलंबिस्त,आंबोली, सावंतवाडी शहर व बांदा या सर्व भागातील ख्रिस्ती बांधव सध्या या माहोलमध्ये रंगून गेले आहेत. नाताळ उत्सव नववर्षाच्या स्वागताच्या शुभेच्छा घरोघरी जाऊन दिले जात आहेत. सांताक्लॉज सर्वांच्या आकर्षण ठरत आहे. गावागावात वाड्या वाड्यात जाऊन सांताक्लॉज लहान मुलांना चॉकलेट खाऊ देऊन एक मनोरंजनात्मक असा संदेश या निमित्ताने दिला जात आहे. सर्वत्र नाताळमय वातावरण तयार झाले आहे.







