Home स्टोरी कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

257

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक संचालक पदाचा नऊ जागांसाठी, बिनविरोध झाली आहे. सर्वसाधारण मधून एडवोकेट संतोष सावंत, रमेश सावंत, लक्ष्मण राऊळ, आनंद बीडये, प्रकाश तावडे, महादेव गावडे, दत्ताराम कदम, महिला प्रवर्ग सुचिता तावडे, अमिता तावडे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सहकार विभागाचे राजन राणे यांनी काम पाहिले. यावेळी गजानन राऊळ, दिनेश सावंत, राजन घाडी, सिद्धेश सावंत, साधना सावंत, बाळू पवार, पांडुरंग मस्त्री, शिवराम धुरी, जानू पास्ते, सुचिता पास्ते, आधी उपस्थित होते.

यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी निवडणूक अधिकारी श्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दुग्ध शेतकरी उपस्थित होते.