Home स्टोरी बिळवस येथे १४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव…!

बिळवस येथे १४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव…!

33

मसूरे प्रतिनिधी: बिळवस दत्त मंदिर येथे १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.सकाळी. १०.०० वा. नारळ ठेवणे व श्रीं च्या मुर्तीचा अभिषेक, सायं. ३.०० वा. सत्यनारायण महापुजा व आरती तीर्थप्रसाद, सायं. ७.०० वा. सुस्वर भजन सायं. ७.३० वा. महाप्रसाद, रात्रौ. १०.०० वा. ह.भ.प.श्री. हृदयनाथ गावडे यांचे सुस्वर कीर्तन, रात्रौ. ११.०० वा. श्री दत्त जन्म व श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ११.३० वा : श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वायरी मालवण यांचा ‘गिधाड पक्षी उद्धार‘ हा नाट्य प्रयोग होणार आहे. उत्सववाचे शताब्दी वर्ष असून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.