Home शिक्षण सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

252

सिंधुदुर्ग(आंबोली): आंबोली- शिक्षण विभाग पंचायत समिती सावंतवाडी व सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विसमेन असोसिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली तालुका सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 20 24 या कालावधीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय दीपक भाई केसरकर यांनी ऑनलाइन पद्धतीने संबोधित करून केले .या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर ,माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी , तालुका गट विकास अधिकारी श्री. वासुदेवानंद नाईक उपशिक्षणाधिकारी आंगणे साहेब, सैनिक स्कूलचे कार्यकारी अध्यक्ष श्री सुनील राऊळ ,कार्यालयीन सचिव दिपक राऊळ आणि सर्व संचालक मंडळ ,सावंतवाडी तालुका गटसाधन केंद्राचे गट समन्वयक श्री. प्रमोद पावसकर, ज्येष्ठ विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, सैनिक स्कूल प्राचार्य श्री नितीन गावडे, चौकूळ व आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आर. बी. गावडे, सावंतवाडी तालुका विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री. ऋषिकेश गावडे सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,व विद्यार्थी ग्रामस्थ आणि विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर यांनी केले .सैनिक स्कूलच्या बालसैनिकांनी सादर केलेल्या विज्ञान गीत व स्वागत गीतांनी साऱ्यांचीच मने जिंकली. माजी शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी ऑनलाइन पद्धतीने विज्ञान प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होतो व भविष्यातील आव्हाने घेण्यासाठी ती सक्षम होतात असे त्यांनी सांगितले .प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. गणपती कमळकर यांनीही वैज्ञानिक शिक्षकांना व संशोधक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी या म्हणाल्या की कोरोना सारखा अत्यंत कठीण काळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण पार करू शकलो. सैनिक शाळेचे अध्यक्ष श्री सुनील राऊळ यांनी सर्वांचे स्वागत करून अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय उपक्रमासाठी प्रशासनाला आपला सदैव पाठिंबा असेल असे सांगितले .

विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा असून या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक गटासाठी एकूण 52 तर माध्यमिक , व उच्च माध्यमिक गटातून एकूण 31 संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृती विज्ञान प्रतिकृती सादर केलेल्या आहेत. तसेच प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्याही एकूण 17 प्रतिकृती विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आलेल्या आहेत सलग दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटांमधून विद्यार्थी प्रतिकृती, शिक्षक प्रतिकृती, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर प्रतिकृती यांच्या प्रतिकृतीं ची मांडणी व परीक्षण होणार केले गेले. निबंध स्पर्धेसाठी प्राथमिक गटातून एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर माध्यमिक गटातून एकूण 25 विद्यार्थ्यांनी आपला निबंध सादर केला .वक्तृत्व स्पर्धेसाठी प्राथमिक गटातून एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर माध्यमिक गटातून एकूण वीस विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व कला सादर केली. शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार असून त्यानंतर होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभामध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

तरी तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा. तसेच हे विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विज्ञान प्रेमी यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी, श्रीमती कल्पना बोडके व सैनिक स्कूल प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी केले आहे.