Home स्टोरी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन.

96

मालगुंड: मराठी साहित्यात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी  ११:०० वाजता कवी केशवसुत स्मारक मालगुंड ता. जि. रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या सभेत सन २०२३ – २४ पर्यंतच्या झालेल्या खर्चाची माहिती देणे व मंजुरी घेणे, सन २०२४ – २५ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन २०२४ – २५ साठी सनदी लेखापाल यांच्या नियुक्तीला मंजुरी घेणे, प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या अंतर्गत शाखांमध्ये केलेल्या नविन सभासदांच्या नावाची यादी सभेपुढे सादर करणे आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणारे विषयावर चर्चा करणे या विषयांवर चर्चा होणार आहे.

गणपूर्ती अभावी सभा तहकुब झाल्यास, त्याच दिवशी त्याच ठिकाणी, अर्ध्या तासाने सभा भरविण्यात येईल, त्या सभेस गणपूर्तीची अट राहणार नाही. तसेच या सभेसाठी काही सभासदांना ठराव वा सूचना पाठवायच्या असतील तर त्यांनी १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत केंद्रीय कार्यालयात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तरी या सभेला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे करण्यात आले आहे.