Home स्टोरी सिंदुर्गातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ व्यक्ती विरोधात पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू!

सिंदुर्गातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ व्यक्ती विरोधात पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू!

18

सुरक्षित व विश्वासाचे वातावरण ठेवून निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडू..! जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल 

 

सिंधुनगरी प्रतिनिधी: निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी व निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची करडी नजर आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 78 आरोपींचा शोध सुरू आहे तर 9 आरोपी फरारी असून त्यांच्याही शोधावर पोलीस आहेत. जिल्ह्यात 798 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयीतान विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेण्यात आली असून यातील काही जणांवर हद्दपदीची कारवाई होणार आहे अशी माहिती सिंधूचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी दिली.

निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक भवनात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदी उपस्थित होते.

भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलमाखाली या जिल्ह्यात 798 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरोधात जिल्हा पोलीस दलाने प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली आहे. यातील काही व्यक्तींविरोधात या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई केली जाईल. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले.

जिल्ह्यातील नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करावे यासाठी पोलीस दल सज्ज असून जिल्हा पोलीस दलाकडे असलेला 1000 पोलिसांचा बंदोबस्त त्याशिवाय 100 जवान असलेल्या केंद्रीय सुरक्षा बलाची पाच पथके या जिल्ह्यात कार्यरत झाली आहे. त्याशिवाय निवडणूक काळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी संचालनाचे काम सुरू होत असून नागरिकांमध्ये विश्वासाचे व सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न आहे. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले.

आपल्या जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक ही दोन राज्य लागून असून त्या सर हद्दीवर दहा चेक पोस्ट कार्यान्वित करण्यात आली आहेत. यातील नऊ चे पोस्ट गोवा सरहद्दीवर व एक चेक पोस्ट कर्नाटक सर्दी वर कार्यरत करण्यात आले आहे. जिल्ह्यात 2996 शस्त्र परवाने असून हे परवाने संबंधित कडून जमा करून घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी संचलन व तपासणी मोहीम विविध टीम द्वारे हाती घेतली जात आहे.

 

१२७ पोलिसांची भरती 

जिल्ह्यात नव्याने पोलीस शिपायांची १०५ पदे भरण्यात आली आहेत. तर २२ वाहनचालक ही भरले गेले आहेत. १५७ पुरुष होमगार्ड व २८ महिला होमगार्डचे भरती झाली आहे. त्यामुळे पोलीस दलाला हे बळही मिळाले आहे.