Home स्टोरी गोळवण येथील विकास कामांचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन!

गोळवण येथील विकास कामांचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन!

134

मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथील विकास कामांचे भूमिपूजन भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.गोळवण ग्रामपंचायत कार्यालय ते बौद्धवाडी (समता नगर) रस्त्यावर जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे, गोळवण शशी राणे घराजवळ जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे या विकास कामांचा शुभारंभ भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्राप. सदस्य साबाजी गावडे, सौ. प्राजक्ता चिरमुले, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गोळवण गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.