कुडाळ: कोणत्याही ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगती ही त्या विभागातील उत्कर्षासाठी महत्त्वपूर्ण ठरत असते. समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना उपक्रमशीलतेच्या नव्या नव्या दिशा मिळतात.सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी शाळांमध्ये सभामंडप असणे ही काळाची गरज आहे. कोकणच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमदार वैभव नाईक तरुणाईला कर्तृत्वाचा राजमार्ग दाखवतात.शैक्षणिक कायापालट घडविण्यासाठी झाराप या ठिकाणी केंद्र शाळेची आधुनिक काळातील गरज लक्षात घेऊन सभामंडपची पूर्तता करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक निधी अंतर्गत ५ लाख रू.मंजूर केले आहेत. त्या सभामंडपाचे गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.
झाराप केंद्र शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, आंतरशालेय कलागुणांना प्रोत्साहित करणाऱ्या स्पर्धा घेण्यासाठी सभामंडप नव्हते. त्यामुळे शैक्षणिक उपक्रम राबविताना बिकट स्थिती निर्माण व्हायची. याबाबत झाराप ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली होती आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ ५ लाख रु.एवढा निधी मंजूर करून दिला आहे.आता या उपक्रमामुळे झाराप केंद्र शाळेत कक्षेत येणा-या अनेक शाळा व शिक्षक,विद्यार्थी यांच्यामध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माणसे घडविण्याची व त्यांच्यात बदल करण्याची ताकद फक्त शाळा अणि मंदिर यांच्यातच आहे.देशाचा व समाजाचा विचार करणारा माणूस घडवून तो उभा करण्याचे काम शाळा किंवा मंदिरच करू शकते या दोनही ठिकाणांचा उद्देश समान आहे.जर अशी चांगल्या विचारांची माणसे या ठिकाणी घडली तर समाजाचा व देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, अल्पसंख्यांक कुडाळ तालुकाप्रमुख तथा झाराप ग्रा.प. सदस्य अश्पाक कुडाळकर, ग्रा.सदस्या तनया मांजरेकर ग्रा.सदस्या,प्रभाकर मेस्त्री,ताता मेस्त्री,अनिल गोडे,नारायण मेस्त्री,बाबू गोडे,यज्ञेश गोडे,अभय आडारकर,अंकुश गावकर,अविनाश मेस्त्री,प्रविण मेस्त्री,प्रताप मेस्त्री,आशिष पाटकर,नितीन कुडाळकर,चंदू मुंडये,उमेश मांजरेकर,मंगेश माणगावकर आदींसह शिक्षक, ग्रामस्थ,पालकवर्ग, विद्यार्थी व शिवसैनिक उपस्थित होते.