Home स्टोरी महाविकास आघाडीच्या “जोडे मारा” आंदोलनात हजरो शिवभक्तांचा सहभाग.

महाविकास आघाडीच्या “जोडे मारा” आंदोलनात हजरो शिवभक्तांचा सहभाग.

86

मुंबई: शिवद्रोही सरकारला अद्दल घडवण्यासाठी आज महाविकास आघाडीतर्फे मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत “जोडे मारा” आंदोलन छेडण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू महाराज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे,शिवसेना नेते विनायकजी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते.