Home स्टोरी लेखक बाळकृष्ण राणे यांच्या ‘जास्वंदी’ कथा संग्रह पुस्तकाचे सायन्सच्या १९८२ च्या बॅचकडून...

लेखक बाळकृष्ण राणे यांच्या ‘जास्वंदी’ कथा संग्रह पुस्तकाचे सायन्सच्या १९८२ च्या बॅचकडून प्रकाशन.

194

सावंतवाडी प्रतिनिधी: बाळकृष्ण राणे यांनी जास्वंदी हे कथासंग्रह लिहिले आहे. त्याचे लिहिते हात खरंच एक वेगळीच अनुभूती आहे.  मी त्याला कॉलेज जीवनापासून पाहतो. तो एक उत्तम लेखक, वाचक आहे. सतत काहीतरी वाचत राहणे, लिहीत राहणे ही त्याची कला खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याने असे सामाजिक  व शोध लिखाण करत राहावे. असे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकिशोर गवस यांनी गौरव उद्गार काढले.

यावेळी जेष्ठ लेखिका उषा परब यांनी बाळकृष्ण राणे यांची कथा बोध घेणारी अशी आहे. चांगले कथानक त्यांनी जास्वंदीच्या रुपात लिहिले आहे. असेच त्यांनी लिहीत राहावे असेही त्या म्हणाल्या. सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाच्या बीएससी १९८२ च्या बॅचच्या वतीने व मित्र मंडळाच्या वतीने लेखक बाळकृष्ण सखाराम राणे यांनी लिहिलेल्या जास्वंदी या कथासंग्रहाचे पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ लेखिका साहित्यिक उषा परब यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री गवस प्रमुख पाहुणे, तसेच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे व तरुण भारतचे पत्रकार एडवोकेट संतोष सावंत, सेवानिवृत्त प्राध्यापक विश्वास जोशी, लेखक बाळकृष्ण राणे, सौ. मनीषा राणे, रमाकांत केरकर, एन. एल. सावंत, प्राध्यापक दिलीप गोडकर आधी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी श्री गवस पुढे म्हणाले बाळकृष्ण राणे हा डोंगरपाल हायस्कूलमध्ये गणित, विज्ञान चा शिक्षक म्हणून त्याने काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत आधार व चंद्रा हि दोन पुस्तके ही लिहिली आहेत. त्याने आता जास्वंदी हे कथासंग्रह लिहून आपली लेखणी अधिक व्यापकतेने पुढे आणली आहे असेच त्यांनी लिहीत राहावे. शोध लिखाण ही त्याची खासियत आहे. त्यांनी श्रीराम वाचन मंदिर मध्ये कॉलेज जीवनात असताना एक तरी पुस्तक तो चाळायचा, वाचायचा आणि हीच त्याची आवड आजही कायम आहे. सुंदरवाडी ग्रुप मध्ये त्याचे लिखाण अधिक व्यापकतेने वाचले जाते. हीच त्याची खासियत आहे. त्यांचे लिखाण म्हणजे सर्व ग्रुप मधील व्यक्तींना मेजवानी असते. असे त्याने स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ लेखिका साहित्यिक उषा परब म्हणाल्या बाळकृष्ण राणे यांनी जास्वंदी हे कथा संग्रह मध्ये त्यांनी विविध प्रकारचे लिखाण केले आहे. सर्व कथा मधून बोध घेणारे लिखाण त्यांचे आहे. त्यांनी असे चांगले लिहीत जावे. त्यांच्या शोध बोध अशा सर्व अंगाने त्यांचे हे लिखाण आहे. तुम्ही लिहिते व्हा, वाचते व्हा. असेही त्या म्हणाल्या .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एडवोकेट संतोष सावंत म्हणाले. प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये साहित्यिक दडलेला असतो. तो लेखक वक्ताही असतो. फक्त त्याने आपल्या मधील गुण व्यक्त करायला हवेत. बाळकृष्ण राणे हे शिक्षक पेशात असतानाही त्याने उत्तम प्रकारे जास्वंदी हे कथासंग्रह लिहिला आहे. ते उत्तम लेखक व साहित्यिक आहेत. त्याने आपली ही साहित्य चळवळ कोकण मराठी साहित्य परिषदेचे त्यांनी कायमस्वरूपी सभासद व्हावे आणि आपली लेखनाची आवड पुढे अधिक व्यापकतेने न्यावी. श्री राणे यांच्यामध्ये लिहिण्याची आवड आहे. ही त्यांनी लिहिण्याची सवय कायम ठेवावी असेही ते म्हणाले.

यावेळी श्री जोशी यांनी आपले विचार मांडले प्रास्ताविक प्राध्यापक दिलीप गोडकर यांनी शिक्षकी पेशात असणारे बाळकृष्ण राणे यांनी आतापर्यंत चांगले लिखाण केले आहे. यापुढेही त्यांचे असे चांगले लिखाण आपल्याला मिळत जाईल असेही ते म्हणाले. यावेळी १९८२ च्या बॅचच्या वतीने बाळकृष्ण राणे व सौभाग्यवती राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन साहित्यिक विनय सौदागर यांनी केले. तर आभार रमाकांत केरकर यांनी मानले. या कार्यक्रमाला सुंदर वाडी ग्रुपचे व १९८२ च्या बॅचचे प्रदीप पेडणेकर, सुखदा पेडणेकर, वर्षा सापळे, उमा वराडकर, सौ. राणे, संप्रवी कशाळीकर, मानसी प्रभू विजय, कांबळे, विलास परब भरत गावडे, रमाकांत केरकर, रोहिणी कांबळे, सौ. केरकर विना परब, अरुण धरणे,  हेमंत झाट्ये, श्रीकृष्ण प्रभू, विद्या जडय, चंद्रशेखर नाडकर्णी.ला, मोतीराम टोपले, चंद्रशेखर नाडकर्णी, नंदू देसाई, विनोद गावकर, मंगल प्रभू, प्राध्यापक सुषमा मांजरेकर, राम वाडकर, आनंद परुळेकर आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या.