Home स्टोरी देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क.

देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क.

107

सावंतवाडी प्रतिनिधी: मतदानाचा हक्क कसा बजावायचा आणि निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते? राजकारण समाजकारण आणि प्रचार संहिता कशी राबवली जाते? आणि कसं प्रचार यंत्रणा असते? याचा अनुभव विध्यार्थ्यांना महाविद्याल जीवनातच व्हावा आणि हेच निवडणूक प्रक्रियेचं तंत्र मंत्र अवगत व्हावे,संविधान मधील घटना लोकशाही चा अभ्यास व्हावा, यासाठी सावंतवाडी येथील लोकमान्य ट्रस्टचे संचलित देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजमध्ये शुक्रवारी कॉलेजची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.

ही निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकसभा विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या धर्तीवर गुप्त मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अशा पद्धतीने तब्बल संपूर्ण दिवसभर कॉलेज परिसरात आचारसंहिता लावण्यात आली होती. या निवडणूक प्रक्रियेत अखेर या कॉलेजचा यावर्षीचा विद्यार्थी जनरल सेक्रेटरी विश्राम कांबळी. तर विद्यार्थिनी जनरल सेक्रेटरी माया गवस या विजयी घोषित करण्यात करण्यात आल्या. निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी गटाच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. अशाप्रकारे प्रथमच या कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतीने कॉलेज निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेच्या कक्षाचे उद्घाटन लोकमान्य ट्रस्टचे संचालक तथा तरुण भारत संवाद चे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर व तरुण भारत चे पत्रकार श्री संतोष सावंत, गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस व सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

विद्यार्थिनी जनरल सेक्रेटरी माया गवस

यावेळी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली या अगोदर जीएस विद्यार्थी प्रथमेश साठ तीन विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले . तर विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी दोन अर्ज दाखल होते. बॅलेट पेपरवर चिन्ह आणि त्यावर प्रत्येक मतदार व्यक्तीची ओळख घेऊन गुप्त मतदान प्रक्रिया घेण्यात आली. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदाराने हक्क बजावल्यानंतर मतदान कक्षातून बाहेर पडताना व आत जाताना सर्व निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रिया प्राध्यापक वर्गाने राबवली. यावेळी उत्साह पूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी निवडणूक कक्ष प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधीने आपापल्या मतदारांना मतदान कक्षा पर्यंत आणण्यासाठी खास यंत्रणाही राबवली होती. जणू जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा निवडणूक प्रक्रिया राबवली जाते तशाच पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवा अनुभव राजकारण म्हणजे काय? आणि निवडणूक म्हणजे काय असते हे महाविद्यालय जीवनातच त्याचा अभ्यास करता आला. मतदान कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ट्रस्टचे संचालक श्री मांजरेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आजच्या काळात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच संविधानानुसार निवडणूक प्रक्रिया कशी असते? हे यातून समजते भविष्यात. यातून एका दुसरा विद्यार्थी विद्यार्थिनी राजकारणात करिअर करू शकेल असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. पंडित यांनी केले.