Home राजकारण कांदा दरावरून राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन!

कांदा दरावरून राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन!

91

राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात कांदा दाराच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आली आहेत. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे सुरु करण्यात येतील. असं सांगितलं होतं. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती तशी काही असल्याचे दिसत नाहीय. अद्याप नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झालेली नसल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कांदा प्रश्नावरुन आणि वाढत्या महागाईवरून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. कांद्याचे दर, द्राक्षाचे पडलेले दर, वाढती महागाई या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरु केलं आहे. कांद्याला कमीत कमी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांचा दर अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन हजार रुपयांचा दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या हातात थोडेफार पैसे राहतील असे शेतऱ्यांचे म्हणणे आहे.