Home स्टोरी दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून कारवाई?

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून कारवाई?

117

रत्नागिरी,दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात ईडीने अनिल परब यांचे यांचे मित्र आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे ईडीने सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. मात्र ईडीने याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही.

सदानंद कदम

सूत्रांच्या माहितीनुसार, सदानंद कदम यांना आता मुंबईत आणले जाणार असून त्यांची कसून चौकशी होणार आहे. यानंतर ईडीकडून अनिल परब यांच्यावरही कारवाई होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून साई रिसॉर्टप्रकरणी चौकशी सुरु आहे. आज शुक्रवार दि.१० मार्च रोजी पहाटे ईडीचे पथक सदानंद कदम यांचे वास्तव्य असलेल्या दापोलीतील कुडेशी या गावात पोहोचले. याठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही काळ सदानंद कदम यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीचे पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासोबत सातत्याने सदानंद कदम यांचे नाव जोडले जात होते. याप्रकरणात आता त्यांना ताब्यात घेतल्याने ईडीच्या कारवाईला आणखी वेग येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.