Home स्टोरी बांदा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी.

बांदा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी.

114

बांदा प्रतिनिधी: बांदा येथे नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. परंपरेप्रमाणे सायंकाळी श्री बांदेश्वराची पालखी वाजतगाजत देवाचा नारळ घेऊन नदीकडे रवाना झाली. मार्गात श्री विठ्ठल मंदिर व श्री पाटेश्वर मंदिराचे नारळ पालखीत ठेवण्यात आले. नदीवर वार्षिक पारंपारिक पुजा करुन देवांचे नारळ नदीला अर्पण करण्यात आले. त्यानंतर लोकांनी आपले नारळ नदीत टाकले. लोकांना तेरेखोल नदीवरील बांदा शेर्ला पुलावर उभे राहून कार्यक्रमात सहभाग घेता आला. पुलावर दुतर्फा तसेच खाली नदी काठीही लोकांची मोठी गर्दी होती. नदीतील नारळ गोळा करण्यासाठी अनेक नाविक व जलतरणपटू नदीपत्रात होते. कार्यक्रमाच्या वेळी पावसाने विश्रांती घेतल्याने लोकांना सोहऴ्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेता आला.

 

फोटो- ( बांदा येथे नारळी पौर्णिमा सणासाठी नदीवर जमलेले भाविक )