Home स्टोरी ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या रौप्य मंडळाच्या रौप्य महोत्सवाचे साक्षीदार होणे हे सर्वांसाठी...

ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या रौप्य मंडळाच्या रौप्य महोत्सवाचे साक्षीदार होणे हे सर्वांसाठी भाग्याचा क्षण..! विनायक राऊत

93

ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावाचा सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी गेली २५ वर्षे ग्रामस्थ मंडळ मुंबई सातत्याने प्रयत्न करते. अव्याहत पणे एखादे कार्य करणे, संघटना दिवसांगणिक सभासदांनी मजबूत करणं सामान्य गोष्ट नसून मंडळाचा रौप्य महोत्सवाचे साक्षीदार होणे हे सर्वांसाठी भाग्याचा क्षण असल्याचे प्रतिपादन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. या मंडळाच्या सहकार्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असे अश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई च्या रौप्य महोत्सवी उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर यवतमाळ वाशीम चे खासदार संजय देशमुख, सरपंच आत्माराम गावकर, अध्यक्ष चंद्रकांत सावंत, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष बाबाजी गावकर,मुंबई ओटवणे असे मंडळाचे संपर्क प्रमुख दशरथ गावकर, उपाध्यक्ष नितीन सावंत, कार्याध्यक्ष गणपत गावकर, सरचिटणीस रामचंद्र गावकर,मनोहर मयेकर,मिलिंद गावकर, खजिनदार गुरुनाथ गावडे, श्रीमती सीता रामचद्र भाईप,आदि मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात राष्ट्र्पती पोलीस पदकाने सन्मानित झालेले प्रकाश महादेव परब, माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी चे विज्ञान शिक्षक मिलिंद गावकर, महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सुरक्षा रक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले प्रल्हाद गोपाळ तारी, तरुण भारतचे पत्रकार दीपक गावकर, जेष्ठ सभासद बाबाजी गावकर,महादेव आनाजी परब, चंद्रकांत पांगम,शिक्षण प्रसारक मंडळ ओटवणे चे खजिनदार मनोहर मयेकर,चंद्रकांत कविटकर, मंडळाचे पहिले खजिनदार भिवा मालजी, प्रमोद मयेकर,तसेच विद्यमान कार्यकारणी सह माजी सदस्याचा देखील शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

ओटवणे च्या माहेरवाशिणी असलेल्या सुप्रसिद्ध गायिका सौ संध्या केळकर यांच्या सुरेल भक्ती व भाव गीतांचा नजराणा सर्वांनाच मंत्रमुग्ध करून गेला.संगित साथ निनाद चिले (तबला), निहार बाईत (संवादिनी), हेमंत मेस्त्री (पखवाज), ममता कदम यांनी या मैफिल कार्यक्रमाला साथ देत या कार्यक्रमांची शोभा वाढवली.मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

तिमीरातुन तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते तथा मुंबई सीमा शुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांचे शासकीय स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थी तसेच पालकांना प्रोत्साहित केले.

विविध शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेल्या मुंबई व मुबंई उपनगरातील कु. अथर्व नारायण परब,दत्तप्रसाद नाईक, पियुष विजय गावकर,ऋषिकेश महेश मालजी,सानिका राजेंद्र गावडे, अक्षरा रामचंद्र गावकर,रविना महेश मालजी,समृद्धी गावकर, मनस्वी महेश उमळकर, या विद्यार्थांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला.

 

रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन..!

मंडळाच्या 25 वर्षाचा एकत्रित आढावा, विविध संकल्प,प्रेरणादायी मनोगते, मंडळाने आजमिती पर्यत केलेले विशेष उपक्रम अशी सर्वकष माहितीचा खजिना असलेली रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबईत दादर पूर्व फिरदोशी रोड येथील सोहरब पालमकोट हॉल ट्रस्ट येथे आयोजित केलेल्या या रौप्य महोत्सवी सोहळ्याला

युवा उद्योजक हरिहर मयेकर,आत्माराम बापू गावकर,गंगाराम बिरोडकर, मंगेश धुरी,विलास तावडे, अमित बिरोडकर,शिवराम गावकर, सहदेव गावकर, महेंद्र गावकर,सचिन भाईप,महेश मालजी, गोविंद नाईक,उमेश भास्कर गावकर,अर्जुन गावकर आदि उपस्थित होते.