Home शिक्षण सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

158

ओटवणे प्रतिनिधी: चौकुळ येथील सामाजिक युवा कार्यकर्ते तथा शिवसेने शिंदे गटाचे पदाधिकारी दिनेश गावडे यांनी सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. दिनेश गावडे यांनी यापूर्वीच सह्याद्री पट्ट्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले आहे.

सह्याद्री पट्ट्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा शैक्षणिक उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत असून त्यांचे आभार मानले आहे. सह्याद्री पट्ट्यात त्यांनी यापूर्वीही धार्मिक सामाजिक कला क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना नेहमीच सहकार्य केले आहे. सध्या शेतकरी वर्गालाही त्यांनी युरिया खताचे वितरण करीत दिलासा दिला आहे. गरीब व गरजूंनाही त्यांनी मदतीचा हात दिला आहे.

सांगेली येथील कार्यक्रमाला दिनेश गावडे त्यांचे सहकारी नंदू गावडे, नारायण गावडे, प्रेम गावडे, संतोष शेटवे, धनंजय गावडे, अक्षय गावडे, संजू गावडे आणि सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे व शिक्षक उपस्थित होते.