Home स्टोरी चिपळुण येथील कॅरम व बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी!

चिपळुण येथील कॅरम व बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी!

131

सावंतवाडी प्रतिनिधी: डेरवण,चिपळुण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्यातर्फे सोळा वर्षांखालील गटात घेण्यात आलेल्या कॅरम व बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या बारा विदयार्थ्यांनी सहभाग घेत आठ पारितोषिके मिळवली.कॅरम स्पर्धेत चार विदयार्थ्यांनी सहभाग घेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.चाळीस स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.बारा वर्षीय राष्ट्रीय खेळाडु साक्षी रामदुरकर हीने तिसरा क्रमांक पटकावुन ब्राँज मेडल मिळवले. बुदधिबळ स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आठ विदयार्थ्यांपैकी तब्बल सात विदयार्थ्यांनी पारितोषिके मिळवली.अठ्ठ्यात्तर स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.ॲकेडमीची सर्वात लहान सात वर्षांची विदयार्थिनी निधी गवस हीने पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेऊन नऊ वर्षांखालील गटात दुसरा क्रमांक मिळवुन सिल्वर मेडल प्राप्त केले.दहा वर्षीय तन्मय शितोळे याने बारा वर्षांखालील गटात पहीला क्रमांक मिळवुन गोल्ड मेडल प्राप्त केले.भुमी कामत हीने मुलींच्या गटात तिसरा क्रमांक मिळवला.आठ वर्षीय राष्ट्रीय खेळाडु यश सावंत याने अनरेटेड गटात पहीला क्रमांक पटकावला.रेटिंग प्लेअरच्या गटात राष्ट्रीय खेळाडु विभव राऊळ याने पहीला क्रमांक आणि भावेश कुडतरकर याने दुसरा क्रमांक पटकावला.कुडाळ येथील अनुज व्हनमाने याने मुख्य गटात तेरावा क्रमांक मिळवला.विजेत्या खेळाडुंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, इत्यादी ठीकाणच्या स्पर्धकांचा सहभाग होता.विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचाच या स्पर्धेत सहभाग होता.सातत्याने पाच वर्षे मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन वर्चस्व ठेवले.सर्व विदयार्थ्यांना ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि बुदधिबळ राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.