Home स्टोरी सावंतवाडी शहरात पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता होणार.

सावंतवाडी शहरात पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता होणार.

120

सावंतवाडी प्रतिनिधी: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर झाड पडून पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता शहरात भासणार आहे. तरी नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनी केले आहे. दरम्यान याबाबत युद्ध पातळीवर काम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.