Home स्टोरी वेरळ (वेरली) येथील तरुणाचे मुंबईत निधन.

वेरळ (वेरली) येथील तरुणाचे मुंबईत निधन.

1888

मालवण: मालवण तालुक्यातील वेरळ (वेरली) थळकरवाडी येथील मूळ रहिवासी तथा सध्या मुंबई भटवाडी, घाटकोपर येथे वास्तव्यास असलेल्या चेतन लक्ष्मण परब (३४) याचे अल्पशा आजाराने सोमवारी सकाळी मुंबई येथे सेवेन हिल रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले.

 

घाटकोपरचे भाजपाचे आमदार राम कदम यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून चेतन परब हे त्या परिसरात परिचित होते. तसेच ते घाटकोपर विभागातील भाजपाचे महामंत्री पद चेतन परब यांच्याकडे होते आमदार राम कदम यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते मागील दोन दिवसांपासून चेतन याची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्याला सेवेन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळता सोमवारी सकाळी त्याचे निधन झाले चेतन हा मागील पंधरा दिवसांपूर्वी वेरळ (वेरली) गावी काकाच्या धार्मिक विधीसाठी आला होता वेरली गावी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात तो नेहमी सक्रियपणे सहभागी होत होता. वेरली  थळकरवाडी येथील ‘परबांचा विघ्नहर्ता’ सजावटीसाठी तो मुंबई येथून प्रत्येक वर्षी आवर्जुन उपस्थित राहून सेवा बजावित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, काका, काकी, बहिणी, भाऊ, भावजई, मामा, मामी, पुतणे, भाची, असा परिवार आहे.

 

गुरुवर्य चंद्रकांत कदम बुवा यांचे पट्ट शिष्य तथा वारकरी सांप्रदायिक भजनी बुवा श्री लक्ष्मण उर्फ बाळा परब यांचा तो मुलगा तर श्री प्रकाश परब, श्री गोपीनाथ परब यांचा तो पुतण्या होय. तसेच परब मराठा समाज-पालघर जिल्हा नालासोपारा संघटक श्री अजय परब यांचा तो चुलत भाऊ होता.

त्याच्यावर सोमवारी सायंकाळी मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेतन याच्या आकस्मिक निधनाने मुंबई व वेरळ (वेरली) येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.