Home स्टोरी छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे उद्या विशेष विमानाने महाराष्ट्रात येणार !

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे उद्या विशेष विमानाने महाराष्ट्रात येणार !

217

१८ जुलै वार्ता: छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांद्वारे अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखे लंडनहून १९ जुलै या दिवशी विशेष विमानाने महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. नागरिकांना ही वाघनखे पहाण्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत. वाघनखांच्या आगमनाचा भव्य सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

 

लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मधून ही वाघनखे ३ वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. पुढील १० महिने ही वाघनखे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यातील अन्य शासकीय वस्तूसंग्रहालयांमध्ये ही वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. ३ वर्षांनी ही वाघनखे पुन्हा ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये पाठवण्यात येणार आहेत.