संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन? संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की आणखी कुठली नशा करतात हा खरंतर संशोधनाचा विषय आहे. या नशेत ते काहीही बोलू शकतात. संजय राऊतांच्या वक्तव्यांवर रोज रोज काय बोलायचं ना? आमच्याकडे काहीही शब्द नाहीत. ते काहीही बोलू शकतात, शिवीगाळ करू शकतात. कोर्टाला, न्यायव्यवस्थेला शिव्या देऊ शकतात. निवडणूक आयोगाला शिव्या देऊ शकतात कारण ते स्वयंभू आहेत. आम्ही संजय राऊतांपुढे हात टेकलेले नाहीत पण त्यांना मोकळं सोडलं आहे. त्यांना रोज उत्तर कोण देईल? ते ज्या भाषेत बोलतात ती संस्कृती आमची नाही. ते किती शिवराळ भाषेत बोलतात हे माध्यमांना माहित आहेतच. त्यामुळे ते कुठली नशा करतात हाच खरा प्रश्न आहे.असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.