Home Uncategorized सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन मध्ये घोटाळा करणारे देशातील पहिले मंत्री म्हणून युवासेनेचा...

सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन मध्ये घोटाळा करणारे देशातील पहिले मंत्री म्हणून युवासेनेचा सत्कार दिपक भाईंनी स्वीकारावा…! योगेश धुरी

163

कुडाळ: केसरकरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम केलंय, नैतिकता ओळखून केसरकरांनी राजीनामा द्यावा. सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर साहित्य पुरवठ्यापोटी काढलेल्या २९ कोटींच्या टेंडरमध्येही निदर्शनास आला आहे. या टेंडरमध्येही शासनाची मान्यता न घेताच ठेकेदाराला पुरवठा आदेश देण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे हे उघड उल्लंघन आहे. या टेंडरमध्येही उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांचे निर्देश डावलून टेंडर वाटप करण्यात आले आहे. उपरोक्त दोन्ही टेंडरमध्ये मंत्री दीपक केसरकर यांच्याकडील शालेय शिक्षण विभागाने कार्योत्तर मान्यता देऊन घोटाळ्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने शालेय शिक्षण विभागाने घोटाळे लपवण्यासाठी सुरु केलेली कार्योत्तर मान्यतेची कुप्रथा मंत्रालयात चर्चेत आहे. असा हल्लाबोल युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर केला आहे.

योगेश धुरी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील बेरोजगार डीएड धारकांना देशोधडीला लावण्याचे ध्येय ठेवणाऱ्या केसकराना त्या तरूणांचे श्राप लागतीलच ज्या मातोश्रीनी केसारकरांना मंत्री केलं त्यांच्या च पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचे पापाचे घडे भरत आले आहेत. संच मान्यता प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील शिक्षण उध्वस्त करणारे केसरकर जिल्ह्याच्या दृष्टीने घातक आहेत. ह्यांना घरीच बसवून कायमचा आराम मतदारांनी द्यावा अशी विनंती आहे. केसरकरांनी जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी मोठी माया जमा केली होती. पवित्र पोर्टल हे केसरकरांच्या अपना सपना मनी मनी चे स्त्रोत आहे.