सावंतवाडी: जीपॅट-२०२४ या फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सुयश प्राप्त केले असुन कॉलेजचे एकूण ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांची ऑल इंडिया रँक पुढीलप्रमाणे – सालस संदीप कामत (७४८), पूर्णानंद संतोष पार्टे (१६७९), तेजस नरेश वाडेकर (२२८३), पूर्वा चारुदत्त जोशी (३८०१), हर्षल देवदास पाटील (५२७५), प्रांजल आप्पा गवळी (७३४८), विद्याधर हरिश्चंद्र वाजे (७९३२), सलोनी लक्ष्मण डोंगरे (७९४८), स्वामीराज विलास देसाई (८२४१), मृदुला प्रल्हाद सावंत (१०१७५), कांचन बसवंत नाईक (१०२५३), गौरी नकुल जगताप (१०६२३), अमित प्रशांत पाटकर (११०८०), कांचन सिद्राम राठोड (१२६०३), ईशा मनोज आरोसकर (१३३३०), पांडुरंग सुभाष सातार्डेकर (१३९०८), सार्थक गणेश खमितकर (१३९९७), अजिंक्य तानाजी पवार (१४२५०), तनया नारायण केळुस्कर (१४६६५), हृषीकेश श्रीकांत कांबळे (१६३७५), अनुष्का सिद्धार्थ नारिंग्रेकर (१६४७४), अनुष्का विनोद नाईक (१७२५५), अभिज्ञा अनिल सावंत (१७९४२), वैष्णवी विजय गावकर (१८३४०), वंशिता जितेंद्र पाटील (२१४३७), जान्हवी हणमंत पाटील (२२६४१), समिक्षा संदिप गावडे (२२९२१), सानिका संदिप आग्रे (२४९८२), अनुष्का लक्ष्मण दोरुगडे (२८१६२), अंकिता अंकुश सदिकले (३०१४४), अनुराग विजय जयगोंडा (३२१५५), आत्मजा देवेंद्र सावंत (३५९२४) व श्रुती जगदीश परब (३७००२)._
जी-पॅट परीक्षा जून महिन्यात संपूर्ण भारतात विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्ते आधारे फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. तसेच गुणांच्या आधारे शिष्यवृत्तीदेखील मिळते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. विजय जगताप व स्पर्धापरीक्षा समन्वयक प्रा. डॉ.प्रशांत माळी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.