राजापुर प्रतिनिधी: राजापुर येथे आयोजित, जिल्हा अजिंक्यपद क्युरोगि व पुमसे तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याने घवघवीत यश संपादन केल आहे. तायक्वॉंदो अकॅडमी राजापुर व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन राजापुर येथे नुकतीच स्पर्धा घेण्यात आली. ५, ६ व ७ जुलै रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत लांजा तालुक्यातील ३५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात क्योरोगी म्हणजे फाईट प्रकारात स्पेशल, सब ज्युनिअर, कॅडेट, जुनियर आणि सिनिअर अशा विविध वजनी गटात. खेळाडू, क्योरोगी (फाईट) प्रकारात प्रीती प्रदिप चौधरी, अनुज बालासो वाडते सुवर्णपदक शितल विरेंद्र आचरेकर, स्नेहल विरेंद्र आचरेकर, तीर्था गणेश यादव, त्रिशा गणेश यादव, युगा प्रसाद डोर्ले, यास्मिन जमीर जमादार, विघ्नेश विनोद दिवाळे, सुजल गौतम कांबळे, श्रेया भिमराव कांबळे, पायल रविंद्र जोशी (रौप्य पदक) सवाब अमीर जमादार, अर्हंत उमेश यादव, परी संजय जड्यार, फरहाना अमीर जमादार, तेजस मनोहर वडवलकर, त्रिशा महेंद्र नारकर (कांस्य पदक) पूमसे प्रकारात तेजस्वी दशरथ लाड, विराज संजय जाधव (रौप्य पदक) तेजस्वी दशरथ लाड, भक्ति भागवत कुंभार, आर्या सचिन पवार (कांस्य पदक) तसेच सहभागी खेळाडू मायरा कुणाल जगताप, श्रीराज संजय जाधव, वेदांत वासुदेव अघाव, दक्षण सचित यादव, रोहन चंद्रकांत साबळे, रिया प्रमोद लांजेकर, अलब्तुल सादिक कोंडकारी, दिव्या महेश चव्हाण हे सर्व सहभागी होते.
तसेच या सर्व स्पर्धकांना लांजा तालुका तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, एकनाथ राणे इंग्लीश मिडीयम स्कूल तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, डी.जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूल तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर, एक्स्ट्रीम क्लब प्रमुख प्रशिक्षक हर्षराज जड्यार यांनी मार्गदर्शन केले.त्याच बरोबर तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा अध्यक्ष किशोर तुकाराम यादव, उपाध्यक्ष अमोल मारुती रेडिझ, सचिव तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळें, सदस्य रोहीत कांबळे, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन चे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा् ,सचिव लक्ष्मण.के कररा्,उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे,खजिनदार शशांक घडशी व सर्व पालकवर्ग आणि लांजा वासियांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.