अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वाया गेला. असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. नेमकं काय म्हणाले अजित पवार?शेतकऱ्यांना आश्वासन मिळालं मात्र, अद्याप मदत मिळाली नही. शेतकऱ्याचं दु:ख पाहवत नही.सहा मार्च ते नऊ मार्च यादरम्यान राज्यातील हवामान बदलले जाईल आणि त्यामुळं अवकाळी पाऊस आणि गारपीट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हरभरा, गहू, मका, ज्वारी, द्राक्ष, भाजीपाला, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं आज आम्ही विरोधीपक्षांच्यावतीने शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. सरकारला अजूनही अंदाज आलेला दिसत नाही. धूलिवंदन, होळी असल्यामुळं बरेच मान्यवर नेते त्यामध्ये गुंतलेले होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा सण आहे. आनंद लुटला पाहिजे. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारनं करावं. विशेषत रब्बी पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. जिथं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे, तिथं नियमांच्या बाहेर जाऊन मदत करावी असेही विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.