Home शिक्षण बिळवसच्या गौरव पालवचे पखवाज वादन परीक्षेत यश! ‌

बिळवसच्या गौरव पालवचे पखवाज वादन परीक्षेत यश! ‌

210

मसुरे प्रतिनिधी: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पखवाज वादन प्रथम परीक्षेत बिळवस येथील गौरव लक्ष्मण पालव ‌ याने प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले आहे. माध्यमिक विद्यालय बिळवस येथे ६ वी इयत्तेत शिकणारा गौरव सुप्रसिद्ध पखवाज वादक महेश सावंत यांच्या येथे गेली एक वर्ष पखवाज शिकत आहे. बिळवस गावच्या सरपंच सौ मानसी पालव यांचा तो मुलगा आहे. गौरव च्या यशा बद्दल त्याचे कौतुक होत आहे.